कोरोना - पृथ्वी चा विनाश
कोरोना - पृथ्वी चा विनाश
कोरोना एक संकट भारी,
पाण्यात बुडवली दुनिय़ा सारी।
मुळात हा एक व्हायरस छोटा,
पण या मुळे झालाय आतंक मोठा।।
कोरोना खरा चायनावासी मुळात,
फासा म्हणून अडकलाय सर्व देशांच्या गळ्यात।
काेरोनानी केला आहे भारतात सुद्धा प्रवेश,
करून धारन विषानुयुक्त बॉम्ब चा वेश।।
मान्य आहे भारतात चायनाचाच माल बिकाऊ,
पण त्यातलं एक तरी असतं का टिकाऊ?
पण या कोरोनानी तर हे खोटच ठरवलं,
मोठ्या-मोठ्या प्रगत देशांनाही हरवलं।।
संपुर्ण भारतात झाल
ी आहे Lockdown ची स्थिती,
सर्वाच्या मनात फक्त कोरोनाचीच भीती।
सर्वत्र देशात मृत शांतता पसरली ,
सोबतच देशाची आर्थिक व्यवस्था ढासळली।।
खाली आहे गरिबांचे जेवनाचे ताट,
मजूरांनी धरली आहे गावाकडची वाट।
पोलीस, डाॅंक्टर व सरकार झटताय फक्त आपल्यासाठी,
रात्रंदिवस लढताय आपल्या जीवासाठी।।
एक निश्चय आपण करू !
सुरक्षतेसाठी घरातच बसू,
वेळोवेळी साबनाने हात घासू।
सर्व घेऊ बाहेर न जाण्याची गोळी,
आणि एकजूटीने देऊ कोरोनाचा बळी ।।