बट
बट
किती छळते गं तुला ती
तुझ्या डोळ्यासमोर येणारी बट
रोज मागे घेण्याची तुला
करावी लागते खटपट
तशी ती बट तुला शोभून दिसते
हळूवार मागे घेताना
तुला लाजवत असते
डोळ्यांना त्या बटेचा काहीच त्रास होत नाही
पुन्हा पुन्हा मागे घेताना
तुलाही राहवत नाही
बोटांनाही सवय झाली
बट मागे घेण्याची
आणि बट मागे घेताना तुला पाहण्याची
किती नटखट म्हणावी गं ती बट
की तिच्यामुळे तू सुदंर दिसतेस
मुद्दामहून तू तिला डोळ्यापुढे आणतेस
खर सांगू का
बट डोळ्यापुढे आल्याशिवाय
तुला कटाक्ष टाकता येत नाही
आणि तुला छळल्याशिवाय
बटही डोळ्यापुढे येत नाही

