बोटाची शाई
बोटाची शाई
हे जे आहे
तेच राहणार
चिंता कोणाची करायची
आपण सुखी तर हा
जग सुखाचा वाटतो
काळजी करू नका
पाच वर्षानंतर
मी पुन्हा येईन
तुमच्या दारात
तुम्हींच आमचे पालक आहेत
तुमच्या लोकांचेमुळे,
ही सत्ता आम्हीं भोगतो
आमची रोज़ची
दिवाळी, दसरेचा वज़न
तुमच्या खांद्यावर
आम्ही टाकणार
तुमच्या आणि
तुमच्या मुलाच्या
भविष्यासाठी आम्ही
लढतो हे जोराने
सांगणार
एकदा तुमच्या बोटावर
ती शाई पडली की
आम्हीं मनात
पुन्हा पुन्हा सांगू
एक सुराने सांगू
हे जे आहे
तेच राहणार
