भाकरी
भाकरी
पोटात भाकरी नाही
देशांच्या मुलाना चाकरी नाही
कस जीवंत राहणार आपलं
मर्यादा आणि देशांची हदी
कोण जिंकतो कोण हरतो
आपल्याला अजिबात ठाऊक नाही
पोटात भाकरी नाही
देशांच्या मुलाना चाकरी नाही
कस जगाव हे एकच ध्येय
या देशांच्या अनमोल गरीबांचा
कोण काय,नाव काय ,जात नाही
फ़क्त झुंज्झतात नवनिर्माणामध्ये
सर्व सारखे आहे या ओळी मध्ये
कोणी कोणाला कधी विसरत नाही
पोटात भाकरी नाही
देशांच्या मुलाना चाकरी नाही
भेटली एकदा एक भाकरी
गर्वाने गाज़ली माझी चाकरी
कळायाला लागला मला
धर्म काय आणि काय कायदा
या अभिमानाने गाज़लो मी
कोण होतो मी विसरून गेलो
ओळी आता पण तिथे आहे बांधवांची
पण मी कोणाला जगु देणार नाही
पोटात भाकरी नाही
देशांच्या मुलाना चाकरी नाही
