STORYMIRROR

Abhay Tayde

Thriller

3  

Abhay Tayde

Thriller

भूक..

भूक..

1 min
218

माणसाच्या जन्मासोबतच जन्मणारी भूक

जागी होते रोज सूर्योदयानंतर

आणि माणूस धडपडतो तिच्यासाठी

जस जन्माला येणारं बाळ धडपडत

असतं मायेच्या दूधासाठी..

बाळाची नाळ जशी जुळलेली असते आईसोबत तशीच

भूकेची नाळ जुळलेली आहे पोटासोबत..

या पोटाची खळगी भरण्यासाठी

ही भूक पसरायला लावते हात गरिबांना लोकांसमोर ,

भटकायला लावते उन्हातान्हात,

अन्

वेळ पडलीच तर रस्त्यावर फेकलेलं शिळं अन्न गिळायला लावते स्वादिष्ट समजवून..

ही भूक श्रीमंतांना जबरदस्तीने घास भरविते

अन्

गरिबांना मात्र मोहताज बनविते एका अन्नाच्या दाण्यासाठी

देहाची विक्री करून जेव्हा भागवावी लागते टिचभर पोटातली भूक

तेव्हा समजते बाकीच्या अवयवाला महत्त्व

नाही पोटा एवढं..

बदलत्या काळानुसार भूक ही बदलत चालली लोकांची

पोटातल्या भूकेची जागा आता वासनेने घेतली

ढेकर येईपर्यंत लचके तोडले जातात मंदीरातच चिमुकलीच्या शरीराचे

तेव्हा समजतं दगड हा शेवटी दगड असतो त्याला कसा पाझर

फुटणार दुःख पाहून चिमुकलीचे..

पोट आधीच भरलेल्यांना निमंत्रण दिली जातात जेवणाची

पण पिढ्यानपिढ्या पासून खड्डा पडलेल्या गरिबांच्या पोटाला रस्ता दाखविला जातो भिकेचा

तेव्हा कळतं या भूकेला ही शिकविल्या

गेला असेल धडा विषमतेचा

जी हातावर पोट असणार्यांसाठी शाप

अन्

गच्च पोट भरल्यावर पोटावरून हात

फिरवणाऱ्यांसाठी ठरते वरदान...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller