जातीयवादाचा संसर्ग..
जातीयवादाचा संसर्ग..
जातीयवादाच्या संसर्गावर
माणुसकीच्या लसीकरणाची
मोहीम हाती घ्यावी आणि द्यावा
पहिलाच डोज त्यांना ज्यांच्या
शरीरात रक्त नाही तर धर्मवाद , वर्णवाद ,
जातीवादाचे जंतू वाहतात..
मास्क लावावा त्यांच्या तोंडाला ज्यांच्या
मुखातून शोषितांवर अत्याचार करण्याचे
शब्द बाहेर पडतात.
पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत
मारावं समतेचं सॅनिटायजर त्यांच्यावर ज्यांनी
हिंदू - मुस्लिम दंगली घडविल्या...
अंतर ठेवावं त्यांच्यापासून दूर
जे माणसात असले तरी माणसात नसतात
कर्मकांड , अंधश्रद्धा , धर्मवाद यांच्यावर
लावावंच लॉक डाऊन ज्यांनी
आज माणूसकीचं डाऊन केली...
