STORYMIRROR

Tej Dakhore

Inspirational Others

3  

Tej Dakhore

Inspirational Others

भारतीय नारी

भारतीय नारी

1 min
178


आदिशक्ती तीच, माता माऊली 

संघर्ष जीवनात, कधी ऊन सावली 

मनगटात सामर्थ्य, किती द्रडनिश्चयी ती 

वेग वाऱ्याचा घेत, थेट चालली की 

गरुड झेप तिची, गगना परी 

सशक्त आजची, भारतीय नारी..१ 


नाही सोडला कधी, कल जीवनाचा

नाही मोडला कधी, कौल मनाचा 

संकटात नाही कधी, घेत माघार 

वेळ प्रसंगी असतो, पुढचा विचार 

मर्यादा तिची नाही, चुला मुला पुरती 

बंद नाही ती आज, चार भिंतीत 

स्वातंत्र्य तिला हो, व्यक्त होण्याचे 

मत मतांतर, विचार मांडण्याचे 

निडर होता, होऊनी पुढारी

सशक्त आजची, भारतीय नारी..२


कुठलेही असो, कोणतेही क्षेत्र

नारी आजची, दिसेल सर्वत्र

कधी वर्दी, खाकी तिला 

हातात कधी, संपूर्ण जिल्हा 

कधी उंच, भरारी आसमानी 

कधी बाजी, प्राणाची रणांगणी 

कधी पक्षाचे नेतृत्व 

महान तिचे रे कर्तृत्व 

तेजाच्या शब्दांत, अति शोभणारी 

सशक्त आजची, भारतीय नारी…३



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational