STORYMIRROR

Tej Dakhore

Romance Others

2  

Tej Dakhore

Romance Others

माझी लेखणी होशील ना

माझी लेखणी होशील ना

1 min
11

ये आईक ना, 

लोक लेखक म्हणतात मला 

माझी लेखणी होशील ना 

शब्दातील भाव माझे 

थोडे समजून, घेशील ना 

नाही होता येत, व्यक्त मला

दूर चालून नेशील ना 

गोंधळलो असलो जरी, मी 

अर्थ शोधून, देशील ना

ये आईक ना. 

माझी लेखणी होशील ना 


कळले नाही, काहीच मला 

शब्द मला, देशील ना 

मी वाक्य कधी,अर्धे असता 

अर्थपूर्ण, होशील ना  

माझे मोडके तोडके, शब्द वेचून 

तू काव्य, विशाल देशील ना

मी नाव, काठावरची 

वाहून मला,नेशील ना

ये आईक ना..

माझी लेखणी होशील ना


मी डोक्यातील, विचार एक

तू शब्दात, उतरशील ना

मी मावळता, सूर्य जसा 

तुझ्यात सामावून, घेशील ना 

मी काळोखी, रात असता 

चंद्र माझा, होशील ना

कवितेला तेजाच्या या 

पूर्ण विराम, देशील ना 

ये आईक ना… 

माझी लेखणी होशील ना 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance