रोग प्रेमाचा
रोग प्रेमाचा
आठवतो जणू तुला
तू साथ स्वप्नाची
माझ्यात जणू गुंतली
तू सात जन्माची
आठवावे तुला
साठवावे तुला
नेहमीच वाटते
पाहावे तुला
वाटते तुझ्यातच
राहावे गुंतूनी
तुझ्यातच मला मी
वाहावे आंतरुणी
साथ तुझा, तुझाच
असावा
तुझ्यात मी तुझाच
दिसावा
विसरुनी सारा, लोभ जगाचा
झाला तेजा या, रोग प्रेमाचा
वाटते कधी, कधी ना कधी
माझीच ती होणार, की
असो किती आग तिला
माझ्या वरती राग तिला
प्रेम माझे, कळता क्षणी
प्रेम तिलाही, होईल की
थोडा का, होईना साथ ती
माझाच शेवटी देईल की
पाहता तिने माझ्यात ती
दिसणार फक्त तीच ती
सारखी वाटते मला
निल जणू दिसणार ती
काव्य माझे फक्त, तिचेच असणार की
प्रेम वेडा किती
झालो असता मी
तेच तेच पुन्हा
जरी असले पुढे
सगळेच वाटते, वाटते नवे
शब्द माझे असले, गुंतले जरी
भाष्य माझे थोडे, कंपले तरी
तिचाच मी असणार हे
आयुष्य माझे ,संपले तरी
@Tejas

