STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Classics

2  

अमोल धों सुर्यवंशी

Classics

बेंदूरबैल

बेंदूरबैल

1 min
337

आता परत जातो कुरवात.

काळी माती घेऊन येतो घरात.

लडबडीत होऊन चिकलान.

दोन बैल बनविन हातानं.


दावणीला नाही उभ जणांवर

वळचनीला नाही लाकडी नांगर

गवानीत टाकीन खोटा चारा.

बांधुन मी या दोघांना

साजरा करीन बैल पोळा.


या सर्व कल्पना मनात डोकावतात

लहान पण हरवल पण

जुन्या आठवणी आठवतात

बैलाची दिवाळी साजरी होत असे.

रंग लावुन शिंगाना त्यावर गोंडा शोभुन दिसे


गावाकडची पिकलेली पाने गळून पडली.

सणा सुदीची मजाच नाही उरली

काटीचा सारा घेऊन संस्कृतीचा नारा देनारा

शेतकरीवर्गच उरला नाही

सणाचा रंग फिका पडला.


आता जातो...........कामावर......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics