बापाची शिकवण
बापाची शिकवण
बापाची शिकवण
गरीब असला तरी
मुळीच लाजू नको
श्रीमंत झाला तरी
कधीच माजू नको
चोर , गुंड पोसलेत
त्यांना कधी भिऊ नको
जगी झाले प्रदुषण
मनी घाण लावू नको
आज कसे सारे जग
झाले स्वार्थी अन् भ्रष्ट
लाव तयाला सुरुंग
दुष्ट सारे कर नष्ट
लाज नसावी कष्टाची
पोट भरुन खाण्याची
लाज वाटावी चोरीची
मनी पाप वासनेची
अल्प काळाचे सोबती
सत्ता , दौलत , संपत्ती
दीर्घायुष्याला उरते
नावाजलेली किर्ती
माझ्या बापाची शिकवण
माय माऊलीचे गुण
केले तयांचे आचरण
नाही कधी खालीपण
