बाप
बाप
बाप तो बाप असतो
गरम पाण्याची वाफ असतो
एखादाच गुन्हा तिथे माफ असतो
बाप तो बाप असतो
आईचा कुंकू मंगळसूत्र
तर हातातल्या बांगड्या असतो
सगळ्यांचा बाप सारखाच नसतो
तरी पण बाप तो बाप असतो
बापावर लिहायला भेटत नाही काही
लिहायला बसले तर पुरणार नाही कागद शाई
पण लिहायला वेळ कुणाला असतो
बाप तो बाप असतो
आई म्हणजे घास असतो
पण बाप म्हणजे जीवनभर शिदोरीची आस असतो
बाप तो बाप असतो
कधी म्याटर झाला तर बाप आठवतो
चेहऱ्यावर प्रेम दिसु न देता जो हृदयातच साठवतो
मुलीला हसत हसत सासरी पाठवतो
पण ती गेल्यावर मात्र तिला रडत रडत आठवतो
बाप तो बाप असतो
बाप असला तर जीवन छान आहे
नाहीतर जिवंतपणीच शम्शान आहे
बाप आपल्याला मारतो झोडतो
शिव्या देतो
तेव्हा आपल्याला त्याचा राग येतो
पण जेव्हा आपण बाप होतो
तेव्हा समजत बाप म्हणजे काय असतो
शेवटी बाप तो बापच असतो
