STORYMIRROR

कदम .के.एल.

Children

3  

कदम .के.एल.

Children

बालकवीता ~ १

बालकवीता ~ १

1 min
348

फुलांनी भरली होती बाग

फुलामध्ये फिरत होता वाघ

त्याला दिसला नाग आणि

वाघाने मारली टांग


फुलांनी भरली होती बाग

फुलावर बसली माशी

मधमाशी आली आणी

तिने मारली तीला नांगी


फुलांनी भरली होती बाग

तिथे आली चिमणी

चिमणी फुले वेचू लागली

बाग मतर लाजरी झाली


फुलांनी भरली होती बाग

तिथे आला हत्ती

हत्तीने घेतला फुलांचा वास

फुलांना कसलाही झाला नाही त्रास


फुलांनी भरली होती बाग

तिथे आले पर्यटक

काय होते एक एक नग

पिशवी भरून फुलं त्यांनी

घेतली ना काढून मग


फुलांनी भरली होती बाग

तिथे आला माळी

माळीने घातले पाणी

फुलांनी दिली एकमेकांना टाळी


-कदम के एल 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children