Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harshawardhan Khandagale

Inspirational

3.3  

Harshawardhan Khandagale

Inspirational

बाबा...!!

बाबा...!!

1 min
918


बाबा या शब्दातच आहे किती गोडवा..

जणू मोराचा पिसारा फुलावा अन् इंद्रधनुत आणखीन एक रंग वाढवावा...||१||


आनंदाचे प्रत्येक क्षण सोबत तुझ्या घालवणे ,

कडू तुझे बोलणे पण प्रेमानेच गोंजारणे..||२||


आठवतयं मला बाबा, ते तुझ्या हातावरचे फोड ;

ते पाहून तर मला अन्नसुद्धा लागेना आता गोड...||३||


धडपडतोय कसा तू दिवस रात्र आमच्यासाठी ;

रडू वाटतंय बाबा मला , मिठी मारून एकदा तुझ्यासाठी...||४||


मी अंधाराला घाबरल्यावर प्रखर उजेड होतोस तू ,

गप्पा गोष्टी सांगून एकदा आमचा मित्रही होतोस तू...||५||


चटके ऊन्हाचे सोसून तू बचाव करतोस आमचा ,

खरं सांगतो बाबा आम्हाला अभिमान वाटतो तुमचा...||६||


आमच्या आयुष्यातील वाटेवरचा सारथी आहेस तू ,

अन् आयुष्यातील अडचणींचा रथ एकटाच सावरतोस तू...||७||


सायकल गाडी चालवायला तर लहानपणीच शिकवतोस ,

आमच्या जीवनातील कसोट्यांचा आधारपण तूच होतोस...||८||


तुझ्या लाडक्या मुलीच्या लग्नात तू अस्वस्थ होतोस ;

दुःख नाही सांगत कधी कोणाला , सांग आता ते का लपवतोस...? ||९||


बाबा , तुझ्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत कोणाला ;

कर मोकळे मन तुझे , दुःख एकदा व्यक्त करा आम्हाला...||१०||


बाबा पावलोपावली चालताना तुम्ही आमचा हात धरला ;

घेतलं सांभाळून ह्या लेकरांना ,अन् दिले बळ आमच्या गरुड झेपेला...||११||


बाबा नमस्कार करतो तुम्हाला , तुमचा आशीर्वाद द्या आम्हाला ,

ओरडून सांगेन आम्ही या जगाला , कधीच विसरू नका त्या प्रेमळ बापाला...||१२||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational