Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harshawardhan Khandagale

Inspirational

3.0  

Harshawardhan Khandagale

Inspirational

पाखरांची शिकवण...!

पाखरांची शिकवण...!

1 min
310


किलबिलणारी पाखरं गगनी झेप घेती..,

इवलुश्या आयुष्याची महती जगास देती..||१||


उंच भरारी आकाशात अल्लडपणेच घेती..,

जगण्याची एक नवी आशा अवघ्या सृष्टीस देती..||२||


भिरभिरणारी हीच पाखरे हर्षुनिया जाती..,

दुःखीजणांना आनंदाची महती पटवून देती.||३||


रिमझिमणाऱ्या पावसामध्ये स्वतःस धीर देती..,

अन् हिम्मतिने जगण्याची कीर्ती अवघ्या जगास देती..||४||


वादळवाऱ्यात पिल्लांचे आपल्या संरक्षण ती करती..,

ममतेची अन् मायेची शिकवण मानव जातीस देती..||५||


चिऊ-चिऊणाऱ्या पिल्लांचे आयुष्य गोड करती.,

अन् मायेच्या त्या प्रेमाची गोष्टही जगास देती..||६||


लहान चिमुकल्या पिल्लांना उडण्यास बळ देती..,

अन् प्रोत्साहनाचे धडे पाखरं यातुनी व्यक्त करती..||७||


दु:खाची ओझी सावरुनी सदनाची निर्मिती करती..,

संसारातील गमती जमती रंगतदार बनवती.||८||


आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाचेच घालवती..,

जीवनाचा हा सार आपणास फक्त पाखरं शिकवती...||९||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational