बाबा (विठू माऊली)
बाबा (विठू माऊली)
बाप माझा विठू माऊली
कसा वर्णनु तुमची थोरवी
शब्दात नाही मांडू शकत
असा माझा बाप सर्वस्वी
मी जन्मन्या आधीपासून
केली माझी खूप काळजी
दिवस-रात्र राबत राहिला
न केली स्वतःची काळजी
अंगाखांद्यावर खेळवले खूप
नाही कमी पडू दिली कशाची
आमच्या शिदोरीची केली सोय
पण स्वतः मात्र राहिला उपाशी
शिक्षणासाठी केला सारा खर्च
नाही केली तडजोड शिक्षणाशी
स्वतःचे स्वप्न साकारले आमच्यात
आनंद साजरा केला माझ्याशी
असा हा थोर बाप माझा
कुठेही कमी पडला नाही
जगण्याची शिकवण दिली
हार मानणे शिकविला नाही
