अस्वस्थता
अस्वस्थता


अस्वस्थता माझी
तुला कशी समजेल
तु माझ्यासाठी काय
आहे हे कधी उमजेल।।
तुझ्या बोलण्याची
दिनरात वाट बघते
तुझ्या मैत्रीसाठी
खूपच मी तरसते ।।
कधी समजतील का
माझे भोळे भाव
तुझ्यासाठी सोडेल
मैत्रीचा आभासी गाव।।
यासाठी ठरवले आता
तुझ्यापासून दूर जावं
तुला सोडून कुणाशी
मैत्री जुळती का पहावं।।