मन हे बावरे...
मन हे बावरे...
सांग मना कसे आवरू
कसे तुला काबू करू ...
सतत विचार तुझाच रे
मनात फक्त तूच रे ...
मन हे झाले बावरे
तुझ्या स्वप्नांचा गाव रे ...
आठवण येते प्रत्येक क्षणाला
बेचैन होईल सांगू कुणाला...
तूच माझ्या आहे जीवनात
प्रेमाचा रंग मम् नयनात ...
समवेत तुझ्या आता राहील
सुख-दुःख सोबतच साहिल...
आयुष्यभराची साथ दे
विश्वासाने हाती हात दे...