निःशब्द
निःशब्द

1 min

67
आली होती रागात
म्हणून नाही बोलले
खरं सांगू न बोलताही
मनाचे तार छेडले।।
आपल्या माणसावर
रागवायचे असते
नात्यापेक्षा मैत्रीत
जास्त जीव बसते।।
निःशब्द तुझे राहणे
मनाला खटकते
अशावेळी मन माझे
थोडेफार भटकते।।
राग केल्यापेक्षा
निःशब्द तुझे राहणे
पटतेय मनाला न
बोलण्याचे बहाणे।।
तरीही वाटतेय तू
हक्क थोडा गाजवावा
मैत्रीत असलेला गोडवा
तुझ्यासाठी वाढवावा।।