असही होऊ शकत प्रेमात
असही होऊ शकत प्रेमात
भेटले होते ते पहिल्यांदा
त्या छोट्याश्या बगीचेत
तिथुनच सुरूवात झाली होती
त्यांच्या या प्रेमाला ||1||
होती ती सायंकाळ
सोबत होता त्याचा मित्रपरिवार
सोबत होता तिचाही मित्रपरिवार ||2||
त्याचाच मित्र होता तिचाही मित्र
त्या दोघांच्या त्या मित्राने
विचारल लगेचचे त्याला
सांग भावा यांतली
कोणती आवडली रे तुला
तिला पाहताच क्षणी
उत्तर दिले त्याने
मित्रा मला तुझीच मैत्रीण आवडली रे ||3||
सुरू झालेले ते बगीचेतले प्रेम
कधी नकळत जीवापाड झाले
त्यांचेच त्यांना कळले नाही
कधी होऊन गेले आज
आपल्या प्रेमाला सात वर्षंं पुरे ||4||
होत होती खुप भांडणे
या सात वर्षां मध्ये
पण प्रेम होते खरे
म्हणुनच तुटले नाही हे बंधने ||5||
केल्या हजारो चुका तिच्या माफ
केल्या हजारो चुका त्याच्या माफ
कारण एकमेकांपासुन दुर जायची
होती भीती दोघांच्याही मनात ||6||
प्रेम खुप होत एकमेंकांच
पण नेहमी तिनेच बोलुन दाखवलं
अन त्याने मनातच अलगद लपुन ठेवल ||7||
लग्न होणार नाही आपलं
हे तर त्याने आधीच ,सांगुन टाकल होत
कारण त्याला तिला लग्नाची
खोटी स्वप्न दाखून
दुःखी कधी करायच नव्हत ||8||
नेहमीच तिला म्हणायचा तो
बाहेर कितीही मुली फिरवल्या तरी
माझं खर प्रेम फकत
तुच असशील
यांच आशेवर ती अजुनही जगत होती ||9||
भेटायला गेली नाही म्हणुन
कारण न विचारताच त्याने
दुसरीवर प्रेम करून घेतलं
हे सात वर्षांच प्रेम त्याने
गैरसमज करून सोडुन दिलं
गैरसमज करून सोडुन दिलं ||10||

