असाच मी एक असतो
असाच मी एक असतो
असाच मी एक असतो, उगाचच कुठेतरी फिरत असतो
कोणीतरी विचारात काय करतोस , काय शोधतोस
मी म्हणालो हरवलं ते
अरे तो तर भूतकाळ आहे तो तू वर्तमानात का शोधतोस
भूतकाळ भूतकाळात विलीन झालेला
भविष्यकाळ अंधारात असलेला
म्हणून तो विलीन झालेला भूतकाळ वर्तमानात शोधतोय
परत आलाय तो भूतकाळ, खुणावतोय मला
म्हणतोय असाच होतास ना भूतकाळात
मग तसाच जगना वर्तमानात
जगायला लागलो तसाच बेधुंदपणे परत
या तरुणाईच्या सान्निध्यात स्वप्न बघत
पण त्यावेळचा तसा मी आत्त्ता नव्हतो
मन खंबीर होत पण जग वर्त
मानातल होत
आणि मी माझा भूतकाळ आत्ताच्या वर्तमानात
जगण्याचा केविलवाणा प्रयन्त करत होतो
पण नव्हतं हे जगणं माझं या वर्तमानातल्या दुनियेला
हिणवलं जगानी म्हणाली दुनिया काय करतोस
तू भूतकाळ आहेस वर्तमान नाहीयेस तू
भूतकाळात तू बेधुंद होतास आता वर्तमानाचं बेधुंद झालाय
जनाची नाहीतर मनाची तरी बाळग
परत जा तुझ्या भूतकाळात
वर्तमानाला नसते तमा भूतकाळाची
आणि
नसते काळजी भविष्याची
मी माझ्या जागी बरोबर आहे आणि
वर्तमान वर्तमानाच्या जागी
मग सांगा मला कोणाचं काय चुकलं