STORYMIRROR

Bahinabai Choudhari

Classics

0  

Bahinabai Choudhari

Classics

अरे रडता रडता

अरे रडता रडता

1 min
1.1K


अरे रडता रडता

डोळे भरले भरले

आसू सरले सरले

आता हुंदके उरले ...


आसू सरले सरले

माझा मलेच इसावा

असा आसवा बिगर

रडू नको माझ्या जीवा...


सांग सांग धरती माता

अशी कशी जादू झाली

देव गेले देवा घरी

आठी ठेयीसनी ठेवा...

डोळ्यापुढे दोन लाल

रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा

तुले रड्याचीरे सवं ...


आसू हसावं रे जरा

त्यात संसाराची चव

कुकू पुसलं पुसलं

आता उरलं गोंधन ...


तेच देइल देइल

नशिबले आवतन

जरी फुटल्या बांगड्या

मनगटी करतूत...

तुटे मंगयसुतर

उरे गयाची शपत

नका नका आया बाया न

का करू माझी कीव ...


झालं माझं समाधान

आता माझा मले जिव ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics