अर्धांगिनी तुझी
अर्धांगिनी तुझी
नव्या आयुष्याची नवी वाट
सप्तपदीने हातात धरून हात
तुजसवे चालले नवी पाऊल वाट
मी अर्धांगीनी तुझी अशीच असू दे साथ
अग्नीसाक्षीने कुंकु रेखाटला भाळी
मंगळसुत्र हिरवा चुडा हाती
तुजसवे गुंफले नवे नाते
मी अर्धांगीनी तुझी अशीच असू दे साथ
उरी बाळगून नवी स्वप्ने
पेरते आले तांदूळ कष्टाचे
तुजसवे पेलून कर्तव्य जबाबदारीचे
मी अर्धांगीनी तुझी अशीच राहू दे साथ
तू केलास माझा सन्मान
माझ्या उखाण्यात तुझा मान
तुजसवे रचते संसाराची स्वप्ने
मी अर्धांगीनी तुझी अशीच राहू दे साथ
साकारले प्रेमळ घरकुल आपले
तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष
तुजसवे टाकीत सारीकडे कटाक्ष
मी अर्धांगीनी तुझी अशीच राहू दे साथ.