अनुभवाचे बोल
अनुभवाचे बोल
अनेक अडथळे आयुष्यात आले
कित्येकदा सावरता सावरता पडलो
झाल्या खूप चुका माझ्याकडून
चुकलेल्या अनुभवातून मी घडलो
चुकलेल्या शब्दांची केली दुरुस्ती
नाही लाजलो केलेल्या चुकांसाठी
अनेकदा चुकलो असेन मी कधी
पण झुकलो नाही कधी स्वार्थासाठी
खोट्या अहंकाराने नाही कधी जगलो
छोट्या-मोठ्या वादळांनी नाही खचलो
ठेच लागून अनेकदा पडलो
पण आत्मविश्वासाने पुन्हा एकदा उभा राहिलो
अधुऱ्या स्वप्नांसाठी परत नाही झोपलो
धडपडलो नव्या स्वप्नपूर्तीसाठी
जिंकण्यासाठी गाजविले मैदान
जिद्दीने आयुष्याचे खेळ खेळलो जगण्यासाठी
आयुष्यातील अनुभवातून खूप काही शिकलो
मैत्रीचे धागे मनापासून जपलो
या धावपळीच्या तंत्रज्ञानाच्या युगात
खूप काही अनुभवातून शिकलो