STORYMIRROR

Jyoti Kothawade

Abstract

3  

Jyoti Kothawade

Abstract

अंत कलियुगाचा

अंत कलियुगाचा

1 min
175

घोर कलियुग 

कोपला निसर्ग 

अतिवृष्टीमुळे 

पाण्याचा विसर्ग ||१||


वादळ पाऊस 

नाही भरवसा 

पिकांची दुर्दशा 

करतो तो असा ||२ ||


गोरगरिबांचा 

वाली नाही कुणी 

पारध्याच्या हाती 

सुत्रे दिली कुणी ||३||


राक्षस जन्मले 

या भुतलावरी 

पोरीबाळींचे ते 

शील भंग करी ||४||


महागाई तर 

गगनाला भिडे 

सर्वसामान्यांच्या 

संसाराला तडे ||५||


घोर कलियुग 

संपताचा काळ 

भरले ते घडे 

पातकी सुकाळ ||६||


देवा कृपा दृष्टी 

व्हावी या संसारी 

येता सतयुग 

संकट निवारी ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract