STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy

4  

sarika k Aiwale

Romance Tragedy

अनोळख्या वाटेवर

अनोळख्या वाटेवर

1 min
247

अनोळख्या वाटेवर भेटती ओळखीचे दुवे 

पाऊलखुणा बघ सांधती ही तुटलेले गावे 


अशाच एका वळणावरती भेटशील परतुनी

ओळखतील नक्षत्रराशी तुलामला कथेतुनी


अनोळख्या वाटेवर भेटती ओळखीचे दुवे 

आठवणी जगतील गळती कणभर आसवे 


नजरेत प्रश्न पुसतील खुण पटली की नाही 

नाकारेल अबोल होकार ओठावर येऊनही 


अनोळख्या वाटेवर भेटती ओळखीचे दुवे 

क्षण धुक्यातले गाव ते मनभरूनी साठवे 


दुव्यातील ओळखीचे प्राण ओंजळीत भरूनी

पाझारतील तेच झरे मनी गोठले होते कुठुनी 


अनोळख्या वाटेवर भेटती ओळखीचे दुवे 

क्षणभराचा शिडकावा सुखाचा भावनासवे... 


मन ओंजळीत घेते आजची आठव साठवूनी 

जुन्या आठवणीची होते नवी कहाणी परतुनी 


अनोळख्या वाटेवर भेटती ओळखीचे दुवे 

पाऊलखुणा पुसट होते कथा परतुनी आठवे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance