STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

अमर प्रेमकहाणी

अमर प्रेमकहाणी

1 min
289

सुंदर तुझी काया, मदहोश ही जवानी

पाहून तुझ्या रुपाला,झालो मी दिवानी.


रंभा, अप्सरा, मेनका, उर्वशी तू स्वर्गपरी

नाही तुजविण सुंदर कोणी, मुळी या भूवरी.


तुझं लाजणं, बोलणं, हसणं, चालणं ग न्यारं

पाहून तुला झालो वेडा, भरलं अंगांत वारं.


वाटे घ्यावं मिठीत तुला, तुझ्या ओठाचं चुंबन

धुंद होऊन जावू दोघं,दे मला तू आलिंगन.


दीनरात मी झुरतो राणी, या चैन जीवाला नाही

ध्यानी, मनी,स्वप्नी तुच, तुजविण सुचेना काही.


हाल माझं घे जानुन तू,घे जानुन माझी प्रीत

जीव माझा तुझ्यात गुंतला, पाहू नकोस अंत.


नको क्षणाचा विरह राणी,लई तळमळतो हा जीव

स्वर्गसुख ते देईन तुला मी, करुन प्रेमवर्षाव.


येऊन माझ्या मिठीत मला तू स्वर्गसुख दिलेस

पुलकित गेलो होऊन दोघं,तू ह्रदय माझे जिंकलेस.


जाऊ दोघं एक होऊन,प्रेमसागरात धुंद नाहू

जवळ माझ्या ये प्रितफुला, प्रेमगीत आज गाऊ.


मी झालो तुझ्यावर फिदा,तू झालीस माझी राणी

तू लैला या मजनूची आपली अमर प्रेमकहाणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance