Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Roshani Khillare

Tragedy

3  

Roshani Khillare

Tragedy

अल्लड प्रेम....

अल्लड प्रेम....

1 min
12K


तिच्या कोवळुस्या जिवाचं

तीच अल्लड ते प्रेम....

कधी कुनामधे गुंतेल

हिचा तिलाच नव्हता नेम.....


न व्हावं तेच व्हावं

अन् दुनिया ने ते पाहावं...

पडली ती प्रेमात

कितीतरी गोष्टींच्या त्या भ्रमात...


मन तीच गुंतत गेलं

स्वप्नांच्या दुनियेत वाहत गेलं...

मागे फिरण्यासाठी वाट ही भेटेना

अवजड त्या विचारांची गाठ ही सुटेना...


थोडंसं थोडंसं मिळवत ते साहस

केलं मग तिनेच ते धाडस...

घाबरत घाबतच

घरच्यांपुढे , मांडलं हे कोडंच...


आई बापाचे हात पाय गळाले

लेकरासाठी पाहिलेले स्वप्नच दूर पळाले...

स्वतः च्या संस्कारांना दोष देत

जीवाला ते हळवत राहिले...


भणक ती लागली दारोदारी

समाजाने सुरू केली कटू शब्दांची मारी..

आपल्याच त्या लेकराला कुणी आज समजेना

खरच ओळख सर्वांची आज पटली ती खरी...


समाजाच्या शब्दांना वर्चस्व देत

सारे शब्दही आता संपले...

शेवटी माय बापच हो ते

आपल्या काळजाला त्यांनीच जवळ घेतले...


खरच काय चूक त्या तिच्या अल्लड वयाची,

काय चूक त्या तिच्या भावनांची,

की तिच्या त्या निरागस प्रेमाची...

लूट - चोरी - खून - खोटेपणा या वाईट गोष्टींना थारा देणाऱ्या

आज या शुद्ध प्रेमासाठीच खरच नजर चुकली का समाजाची?

.......खरच नजर चुकली का समाजाची?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy