Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priti Dabade

Inspirational

4  

Priti Dabade

Inspirational

अहंकार

अहंकार

1 min
301


कसला वाटतो एवढा अहंकार

हेच का आपले संस्कार


सत्ता, पैसा सारे नाशवंत

वाटे अप्रूप ह्याची खंत


रंग रूपाचा नको गर्व

नाही टिकत शेवटी सर्व


माझ्यामुळे सर्वांचे खूप अडते

भ्रम सोडा कसे नडते


समजे स्वतःस नेहमी सर्वेसर्वा

करत नाही इतरांची पर्वा


घ्या जीवनात थोडी माघार

मिटवा हा अहंकाररूपी अंधार


अहंकार एक वाईट विकृती

बदलून जाई चांगली नीती


स्वार्थ अन् मोठेपणा सोडा

नात्यांमध्ये होई मोठा राडा


शून्यातून विश्व उभारण्यात आयुष्य जाते

अहंकाराने क्षणातच कवडीमोल होते


अहंकाराने व्यक्ती स्वभोवती फिरतो

दुसऱ्यांना तुच्छ लेखत राहतो


अहंकारी व्यक्तीजवळ नसे विनम्रता

विसरूनी जाई नात्यांतील ममता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational