अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर


लेक अहिल्या जन्म घेवूनी
वडील माणकोजीने घडविले
देवूनि धडा शिक्षणाचा
शौर्य कर्तुत्वाने मडविला ..
होती तत्वज्ञानी अन् न्यायदानी
मावळातील ती जागृत राणी
घेवुनि सन्मान तो संतांचा
गाते पराक्रमाची गाणी..
दुःखी शेतकरी गरिबांसाठी
मंदिर,तळे,तलाव खुले
विधवांच्या मदतीसाठी
साहित्यिकांसाठी ही वाहुनी फुले
संस्कार मल्हार होळकरांचा
कर्तृत्वावर निपुण विश्वास
होती किर्तीची रणरागिणी
जिद्द, चिकाटीचा तो सहवास
बुद्धी, चांगुलपणाचे ते बहुगुण
समस्त स्त्री वर्गाला वारसा
दूरदृष्टीचा तो नारा अनोखा
उत्तम राज्यकीर्तीचा आरसा.