STORYMIRROR

Dilip Dhaigude

Others

3  

Dilip Dhaigude

Others

व्यथा कामगाराची

व्यथा कामगाराची

1 min
11.9K

आयुष्य मी ही जगतो आहे

मन, भावना मनात ठेवून,

अंधःकारातील तेजस्वी काजवा बनून

न्यायाच्या कवाडातील साक्ष देऊन,

पोट माझे ही भरतो आहे

उगवत्या भास्कराला नमन करून,

माझी व्यथा ही सांगतो आहे

पातीवरील दवाश्रुमध्ये शमन होऊन,

ऊन,वारा समजत नाही

सूर्य आग ओकतो आहे,

माणुसकीच्या पात्यामध्ये

स्वार्थ,अहंकार झुकतो आहे,

माय बापडे झोपडीमध्ये

संघर्षाच्या वेदना घोघत आहेत,

प्रेम, आपुलकीच्या तहानेनं

रात्रंदिवस माणुसकीचा धडा शोधतआहेत,

मी एक कामगार आहे

लाव्हारासातील तेज जणू,

व्यथा माझी गातो आहे

स्वाभिमानाचं ओझं घेऊन


Rate this content
Log in