व्यथा कामगाराची
व्यथा कामगाराची
आयुष्य मी ही जगतो आहे
मन, भावना मनात ठेवून,
अंधःकारातील तेजस्वी काजवा बनून
न्यायाच्या कवाडातील साक्ष देऊन,
पोट माझे ही भरतो आहे
उगवत्या सूर्याला नमन करून,
माझी व्यथा ही सांगतो आहे
पातीवरील दवाश्रुमध्ये शमन होऊन,
ऊन,वारा समजत नाही
सूर्य ही आग ओकतो आहे,
माणुसकीच्या पात्यांमध्ये
स्वार्थ,अहंकार झुकतो आहे,
माय बापडे झोपडीमध्ये
संघर्षाच्या वेदना घोघत आहेत,
प्रेम, आपुलकीच्या तहानेने
माणुसकीचा धडा शोधत आहेत,
मी एक कामगार आहे
लाव्हारसातील तेज जणू,
व्यथा माझी गातो आहे
स्वाभिमानाचं ओझं घेऊन
