अबोल शब्द
अबोल शब्द
शांत संध्याकाळी समुद्रकिनारी
तुझी वाट बघत बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी
गूज तुझे उलगडत होतो....
चाहूल तुझी लागताच
मन हे बहरुन गेले
तुझ्या नयनांच्या
इशाऱ्यात अडकवून मज
शब्द अबोल पसार झाले..
