अबोल प्रीत
अबोल प्रीत
अबोल प्रीत माझी
अबोल मनातले गीत
गुंफित राहीले तशीच
मनातली अबोल प्रीत
निःशब्द माझ्या भावना
अबोल माझी वाणी
कधी वाचता येतील का
ओठावरील गाणी
डोळ्यातील पापण्यांत
थिजले ह्दयाचे पाणी
दूर तू जाताना होतो
जीव माझा केविलवाणी
हृदयातील प्रीत माझी
त्याची झाली कथा
अबोल प्रीतीने प्रेमाची
शब्दात मांडली व्यथा
🍁🍁🍁🍁

