STORYMIRROR

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Classics Inspirational Others

3  

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Classics Inspirational Others

अभिमान मायमराठीचा

अभिमान मायमराठीचा

1 min
128

मराठी असे आमुची आन-बाण-शान...,

मराठी असण्याचा आम्हांस अभीमान..!!


मराठी भाषा आमुचा ज्वलंत स्वाभीमान...,

वेळप्रसंगी देऊ मराठी रक्षणासाठी प्राण..!!


मराठी भाषा आमुची असे अमृताहुनही गोड...,

दुसऱ्या भाषांहुन अधीक मायमराठीची ओढ...!!


मराठीस लाभली संत साहीत्यीकांची संगत...,

मराठी भाषेमुळे येते आमुच्या जीवना रंगत..!!


धन्य जाहलो घेऊनी जन्म पावन महाराष्ट्रात...,

महाराष्ट्राची किर्ती पसरली दुरवरच्या देशांत..!!


कपाळास लावीता टिळा मराठी भाषेचा...,

अंगात भिनतो जणू पराक्रम शिवरायांचा..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics