Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

poornima bongale

Inspirational Others

4  

poornima bongale

Inspirational Others

आवाज

आवाज

1 min
14K


दार सताड उघडं आहे तिचं

वारं भरून राहतं कानाकोपऱ्यात,

कसले-नुसले वास येत राहतात

जळपाचे, संशयाचे, तिच्या कर्तृत्वाचे....


ती खोल श्वास घेते ऊर भरून

कान टवकारतात तिचे,

कसले-नुसले आवाज घुमत राहतात डोक्यात

बाथरूम मधल्या नळातून टपकणाऱ्या थेंबांचा,

फ्रीजच्या सतत घरघरीचा,

घड्याळातल्या काटेरी टकटकीचा,

भाकरी उलतताना तव्यावर पडलेल्या उलातन्याचा,

कुकरमध्ये पाणी जास्त झाल्यावर

बाहेर पडण्यासाठी उतावीळ फुसफुशीचा

तेलात टाकलेल्या

मेथीच्या भाजीच्या चरचरीचा

तडतडणाऱ्या मोहरीचा

चरचरणाऱ्या कांद्याचा

मग हातातून निसटलेल्या चंबूचा, चमच्याचा

पडून तुटलेल्या चिनीमातीच्या कपांचा,

संध्याकाळी लागणाऱ्या,

विविध भारतीच्या 'आपकी फर्माईश' चा


खिडकीतून हाक येते समोरच्या काकूंची

वाफ पोचलेली असते त्यांच्यापर्यंत,

उकडीच्या मोदकांची ! Royal Enfield चा

आवाज येतो तिला फटफटीचा,

दार उघडंच असत, त्याच्या स्वागतासाठी!


पोळ्या करताना शेजारी थांबतो तो,

छंद असतो त्याला ’तिला’ न्याहाळण्याचा

तिला पुन्हा आवाज येतो

त्याने पुसून घेतलेल्या कढईचा

त्याच्या तृप्त ढेकराचा...


एव्हाना ती कुशीत लपेटलेली असते त्याच्या

श्वासाचे आवाज त्याच्या, गुंजतात कानात तिच्या

त्याच्या छातीवर डोकं ठेऊन

साठवून घेते ती आवाज त्याच्या धडधडीचा

वाटतं, कणीक थोडीशी घट्ट झाली

पोळ्या वातड होणार सकाळच्या

भाजीत थोडसं कूट घालावं दाण्याचं,

लसूण-दाणे एकत्र कुटायचे

खलबत्त्याचा आवाज आठवत राहतो तिला


संसार भिनलाय तिच्या कणाकणात

तिला आवाज येत राहतो

रक्तात थयथयाट करणाऱ्या संसाराचा....


दार सताड उघडं आहे तिचं

वारं भरून राहतं कानाकोपऱ्यात,

कसले-नुसले भास होत राहतात

नवऱ्याचे, कुटुंबाचे, तिच्या संसाराचे....

खिडकीत बसून पाहतेय मी हे सगळं

डोळ्यात वादळ उठलंय माझ्या

तिचं बेभान होणं, हैराण करतं मला

पण................

खिडकीतून फक्त झुळूक येते

झंजावात नाही!



Rate this content
Log in

More marathi poem from poornima bongale

Similar marathi poem from Inspirational