STORYMIRROR

Sandeep Jangam

Romance

3  

Sandeep Jangam

Romance

आठवण

आठवण

1 min
333

तूझ्या आठवणीत

दिस कधी सरला कळलं नाही

रात्रीचं स्वप्न पाहताना

पहाट केंव्हा झाली उमगलंच नाही.. 

सूर्य उगवला..

कि होते पहाट

तूझ्या आठवणींचा..

मग सुरु चिवचिवाट.. 

आठवण तूझी आल्यावर

डोळे मिटून मी घेतो

पापण्यांच्या आडोशाला

मनसोक्त तुला भेटून मी घेतो.. 

उठ सुठ कधीही येतात,

दाटून तूझ्या आठवणी

हसता हसता अचानक,

डोळयांत साचत पाणी..

आपसूक येत पाणी

आठवण तूझी आल्यावर

काहीतरी गेलं असावं डोळ्यात

असंच सांगतो कुणी विचारल्यावर.. 

आठवणीत तुझ्या

दिस कधी सरतो हेच कळत नाही... 



এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Romance