STORYMIRROR

Akshay Kadam

Inspirational

4  

Akshay Kadam

Inspirational

आरसे

आरसे

1 min
24.4K

दुसर्‍याच्या दृष्टीची जाण ठेवून

इथे सृष्टी नवी घडवावी लागते,

विरहाच्या आगीत बुडलो तरी,

तुटलेल्या पंखासवे उडावे लागते


पडशील, धडपडशील, लागेल ठेच,

आज चाललेल्या वाटेला उदया पुन्हा भेट

हलकीशी स्माईल दे त्याच खड्ड्यांना,

आणि मग चाल ध्येयाकडे थेट


मध्ये सुरसपाटा चालेल प्रश्नांचा

तू उत्तरांची लगोरी बांध

समस्यांना धप्पा देवून

नव्या राज्यात नांद


त्या राज्यात फक्त नसशील तू

पाहून इतरांना कदाचित रूसशील तू

सोबत मात्र मोजकेच करतील

ज्यांच्यासोबत रडशील आणि हसशील तू


सायकलीचे हे चाक,

नेहमीच गोलगोल फिरत राहणार

थांबायचं नाही ठरवलंस ना तर,

तू नेहमी नव्याने घडत राहणार


इथे

स्वतःच स्वतः ओळखावं लागतं,

त्याशिवाय किंमत कळत नाही

कारण 

खरा चेहरा दाखवणारे आरसे,

आजकाल बाजारात फारसे मिळत नाहीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational