Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Akshay Kadam

Others

4.0  

Akshay Kadam

Others

चल थोडं प्रेमावर बोलू

चल थोडं प्रेमावर बोलू

1 min
43


आजकाल आयुष्यात टिकतं कमी

व तुटतंच जास्त.

प्रेम असो वा नातं.

खंबीर राहण्याचा धीर 

नसतोच कुणाकडे आजकाल.

धकाधकीच्या धावपळीत

वेळ निघून जाण्याची भीती असते.


पु.ल., वपुंचा काळ वेगळा होता.

आजमितीला तो काळ राहिला नाही.

पण फिलाॅसाॅफिकल म्हणून चिडवता चिडवता

प्रेमाचा खरा वास्तववाद कुणी पाहिला नाही.


जगणं तेव्हाही तसच होतं,

पद्धत थोडी आता बदललीयं.

पुस्तकांना कोपर्‍यात ठेवून,

पिढी टेक्स्टिंगकडे वळलीयं.


एक आरसा आहे कुठेतरी,

आपल्या दोघांना जगवणारा.

प्रत्यक्षात मात्र चिडीचूप्प,

पण मोबाईल थ्रू हसवणारा.


"I don't know, it will work or not."

मी असेन, आणि असशील ही तू.

Nothing sure about our uncommon नातं.

But I'll be always there for you.


लोक भविष्यात नातं शोधतात.

मी नात्यात भविष्य शोधतो.

धूसरश्या पट्ट्याला दुर्बिणीतून पाहताना,

आपण मात्र एक दिसतो.


तू एक्स्ट्राॅवर्ट, मी इंन्ट्रोवर्ट.

तू हायफाय, मी sci-fi.

तू एक कांडीवर रेंज शोधणारी,

मी अनलिमिटेड वायफाय.


हंपीची देवळे असो वा

असो ह्रषिकेशचा घाट.

मनालीचा बर्फ असो वा

असो मैसूरचा पाक.

कितीही फिरलो खंडीभर,

तरी नेहमीच आठवतं मला

आपलं शिवाजी पार्क.


कसं होईल, का होईल,

कुठवर होईल?

काहीच माहीत नाही.

हा. पण जे काही होईल

ते जेन्युअन होईल.


आणि कसयं ना!

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडलं की

संपलच ना सगळं.

त्यामुळे राहूदेत काही पेंडींग प्रश्न.

कारण आयुष्याची खरी मजा ही

काहीतरी शोधण्यातच आहे.


Now it is up to you.

तू ठरवं, तुला कसं जगायचयं.

एक well settle obvious लाईफ

का एक धडपडणारी thrilling लाईफ.


तू स्पेशल आहेस,

मी डल.

मी काॅमन,

तू अनकाॅमन.

बट "अपोझिट अट्रॅक्टस" चा नियम पाहिला

तर "विन-विन सिचुयेशन" ही तुझ्या हाती आहे.


गमक हयाचं शोधूच नये,

चालायच ते चालतच राहील.

नक्षत्रांना न्याहाळताना,

एक पुस्तक दिवास्वप्न पाहत राहील.


असो

बोलणं आपलं होतच राहिलं

अधून मधून जरा हटके बोलू.

टिपिकल झालेल्या आयुष्यात

थोडं का होईना, पण प्रेमावर बोलू.


Rate this content
Log in