आरसा ... मनाचा
आरसा ... मनाचा
आरशात डोकावताना स्वतःलाच विचारा की समोर दिसणारा चेहरा खरंच आपला आहे का
त्या चेहऱ्यावर पांघरलेले भाव थेट ह्रुदयातून आलेले आहेत का
चेहऱ्यावरच्या त्या विखुरलेल्या रेषांमध्ये खरच आपलं मन प्रगट होत आहेत का
त्या डोळ्यांमधून खरंच तेच पाहतोय का जे सत्य आहे
त्या कानांमधून तेच ऐकतो आहोत का जे सत्य आहे
त्या ओठांमधून जे शब्द बाहेर येत आहेत ते थेट ह्रुदयामधूनच पाझरत आलेले आहेत का
त्या आरशात दिसणारी व्यक्ती खरच मी आहे की अजून कोणी
जिला स्वतःचे अस्तित्वच नाही...
त्या आरशाला तरी फसवू नका, त्याच्यासमोरतरी व्यक्त व्हा
मनसोक्त हसा, रडा, चीडा पण व्यक्त व्हा,पण व्यक्त व्हा
