STORYMIRROR

Smita Rai

Others

3  

Smita Rai

Others

हास्य

हास्य

1 min
503

चेहऱ्यावरचे हसू आहे एक अनमोल दागिना

ज्यात दिसते हृदयाची सुंदरता

ह्या हास्याचे पण पैलू अनेक

काही चेहऱ्यावरील हसू असते अगदी निरागस... नवजात अर्भकाच्या चेहऱ्यासारखे

काही चेहऱ्यावरील हसू असते केविलवाणे .. पोटातील भुकेतून आलेले

काही चेहऱ्यावरील हसू असते प्रसन्न .. आयुष्यात आनंदी असणारे

काही चेहऱ्यावरील हसू असते स्वच्छंद .. कशाचीही चिंता न करणारे

काही चेहऱ्यावरील हसू असते कृत्रिम .. जे नसते आतून आलेले

काही चेहऱ्यावरील हसू असते समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारे

काही चेहऱ्यावरील हसू असते अंतर्मुख करणारे.. अस्वस्थ मन सांगणारे

काही चेहऱ्यावरील हसू असते दुःखाची किनार असलेले .. दुःख पोटात साठवणारे

 चेहऱ्या वरच्या हास्यामागचे रहस्य समजून घ्यायला आधी माणूस बनावे लागेल

आणि मग मनात डोकावून हृदयाने हृदयाशी बोलावे लागेल…


Rate this content
Log in