पतंगाची दोरी..
पतंगाची दोरी..
1 min
313
हे आकाशात उंच उंच उडणाऱ्या पतंगा
माझं मन पण आसुसले आहे त्या उत्तुंग आकाशास स्पर्श करण्यास
मला माहितीये कि तूला स्वतःला नाही झेप घेता येणार
कारण तुझी दोरीतर माझ्याच हातात आहे
पण मी माझ्या आयुष्याची दोरी नाही दुसऱ्याच्या ताब्यात देणार
मी तर स्वच्छंदी आहे , माझे उंच उंच झेप घेणे हे मीच करू शकते
माझ्या आयुष्यातही तुझ्याप्रमाणेच वादळे येत राहणार
जी मला उत्तुंग उडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणार आहेतच
पण मी निराश नाही होणार, तुझ्यासारखेच सतत प्रयत्न करत राहणार
सुख आणि दुःख्खाच्या हिंदोळ्यावर झुलता झुलता
सतत उडण्याचा ध्यास घेत राहणार
कारण माझ्या आयुष्याची दोरी तर माझ्याच हातात आहे ना ...
