प्राजक्ताची फुले ....
प्राजक्ताची फुले ....
1 min
1.4K
झाडावरून प्राजक्ताचे ते फुल माझ्या ओंजळीत पडले
अन माझी ओंजळ सुगंधाने भरून गेले
पडताना त्याला वाटले त्याचे जीवन सार्थकी लागले कारण जाता जाता
त्याने मला सुगंधाचे दान दिले ...
अलगद
त्या प्राजक्ताच्या फुलाने जाता जाता मला बरेच काही शिकवले
आणि मलाही दातृत्वाचे दान देऊन गेले
मलाही आता एक दिवस पडण्याआधी
त्या प्राजक्ताच्या फुलाने दिलेले दान स्वीकारायचे आहे...
कोमेजून जाण्याआधी कोमेजलेल्या चेहऱ्यांना हास्य द्यायचं आहे
आणि प्राजक्ताच्या सुगंधासारखे त्यांच्या मनात दरवळत राहायचे आहे...
