आणि श्रावणाच्या सरी सोबत
आणि श्रावणाच्या सरी सोबत
आणि श्रावणाच्या
सरी सोबत
उडत येतो पारवा,
शांत बस्त्या तळ्याशी खेळतो
एकट्याने गारवा
सरींचा शोध घेत असता
फुलतो पिसारा मयुचा
शहारे उडवून गारठा ही
छेड घेतो तनूचा,
आसमंत कधी निळा
कधी काळा जांभळा
कधी इंद्रधनू
लपंडाव मांडून छळतो
या पावसाला काय म्हणू ?
पाचूच्या रेषा अचाट
भिजलेल्या दिशा अचाट
उगाच कुशीत दरीच्या
शिरते सरीची ओली लाट
स्पर्श करून घ्यावे पिऊन
धुके दाटलेले गावभर
भिजून यावे
थिजून घ्यावे
बाहेर येऊन सवडभर
पाखरांच्या चाली मंद
शब्दातले ऋतू धुंद
वेडाची कहाणी न्यारी
लागता पावसाचा छंद
कहाण्या, कथा माळून सरीत
आठवणींच्या बटव्या
सहित
पावसाळा येऊन जातो
वेड्याला वेडा करीत
