एका पावसाने...
एका पावसाने...
1 min
307
एका पावसाने
गेल्या पावसाची
जाणून आठवण केली
त्या ओल्या दिवसाची
एका मोकाट सरीने
एका लाजऱ्या सरीस
कोसळताना उगाच
का धरले वेठीस
एका वाऱ्याच्या वेगाने
दुसऱ्या वाऱ्याच्या वेगास
हाती हात घेत नेले
गराठ्याच्या भरास
एका दरिने लोटले
धुके दुसऱ्या दरीत
अशी निभावली तिने
पावसाची ओली रीत
एका ओल्या सांजवेळी
तिन्ही सांजा ओलावल्या
त्यांनी हसून काही
पुन्हा सरी बोलवल्या
असाच एक श्रावण
गेल्या श्रावणाशी बोलला
या वर्षीचा पाऊस
गेल्या पावसाहून खुलला...
