STORYMIRROR

Vani Takawane

Classics

4  

Vani Takawane

Classics

आम्ही एकपात्री

आम्ही एकपात्री

1 min
305

गर्द असतो अंधकार 

पडदा उठतो 

नाचतो कलाकार

आम्ही एकपात्री

जगतो जीवन "नाटक" सरकार


पूर्वेचा जन्म

पश्चिमेला मारतो

कंपित होऊनि मानव

या भूवरती थरथरतो

जगतो जीवन "नाटक" वांरवार


संभाषणे सुरात

संगीत सुरात कानी पडती

आयुष्याच्या मार्गावर ही

तिसरी घंटा कशाला वाजती

चालते जीवन "नाटक" दरबार


आभुषणे भावनांची 

चितेपर्यन्त साथ देती

सजलेला ,नटलेला देह

एक मेका मातीतच पुरती

मनुष्य बनतो "नाटक" कलाकार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics