काय नातं आपलं
काय नातं आपलं
काय नातं आपलं या जगाला गं मान्य आहे
तुझ्या माझ्या प्रेमाला कोणाचा आधार आहे
मन माझे जसे बघ अंधारात गं काजवा
तुझ्या जीवनासाठी मी उजेडाचा दिवा आहे
काटेरी या वाटेवर सगळे काटे मी गं वेचील
तुझ्या पाऊलांसाठी हिरवा गालिचा होणार आहे
नको करू आग्रह लोकांनी गं गावात घ्यायचा
तुझ्या खुशीसाठी बांधावर महाल बांधनार आहे
पदराला तुझ्या आंनदाची झालर गं लावुन
तुझ्या शालुसाठी चांदण्या आणणार आहे

