STORYMIRROR

Varsha Fatakale warade

Classics Others

4  

Varsha Fatakale warade

Classics Others

आल्या सोनपावलांनी गौराई दारी

आल्या सोनपावलांनी गौराई दारी

1 min
335

सोळा शृंगार अलंकृत अन्नपूर्णा

आल्या सोनपावलांनी गौराई दारी

मंगल धूपदीप, पंचपक्वान्न नैवेद्य 

सुख संपन्नता घरात आणली सारी


लिंबलोण करुनी स्वागत सदना

थाटमाट भव्य, प्रफुल्लित तन मन

आनंद उत्साहात गौरी आवाहन

नक्षत्र अनुराधा होतसे आगमन


नथ, मंगळसुत्र,सुवर्णकडे ल्याली

नटली गौर पैठणी शोभते खास 

हिरेजडित मुकुट,मोती हार गळा

ओटी भरू आंनदे, मांडली आरास


भक्ती सद्भाव वृध्दिंगत अंतरात

माय माहेरा गौरी सदैव तिचा वास

सवाष्ण बोलवू झिम्मा फुगडी खेळू

सदनी पावित्र्य, मांगल्याचा श्वास


पुरणपोळी, मिष्टान्न,चकली

लाडू,करंज्या,पंचपक्वान्न अर्पण

नाना सुगंधित फुल माळा गुंफून

करू प्रार्थना शुद्धभाव समर्पण


सौभाग्य दान,भरभराट संसारात

मागते गौरीस सुगंधी राहो कर्म

भक्ती रंगात मन रंगुनीया सर्व

जाणावे अनमोल जीवनाचे मर्म


गहिवरले सर्वांचे हे मन येता

तीन दिवसांनी निरोपाचा क्षण

आशीर्वाद तुझा सदैव आमच्यावर

सुंदर विचारांचे लाभावे सर्वा धन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics