आला श्रावण
आला श्रावण
आला श्रावण, श्रावण
धुंद बेधुंद होवून
सजली वसुंधरा
नव्या हिरवाईनं
श्रावणात चाले रोज
ऊन पावसाचा खेळ
सप्तरंगी कमानीचा
नभी जमतोय मेळ
गायी गुरे होती खुश
चारा होई भरपूर
फुलांवर भिरभिरे
फुलपाखरु सुंदर
सण उत्सव घेई
येथे श्रावण साज
पावसात हिंदोळ्याचा
मनी आनंदाचा ताज
हिरवं शिवार पाहून
राजा हसतो मनात
त्याच्या कष्टाचा आनंद
डोले साऱ्या शिवारात
