"आहो ऐकता का?
"आहो ऐकता का?
"आहो ऐकता का?_
_प्रचाराचा धुराळा
निवडणुकीचा जल्लोष,
विजयाचा आनंद,
उडणारा गुलाल,
गळ्यात पडलेली माळ
व
कार्यकर्त्यांचा गराडा....
यातून थोडं बाहेर पडून
ते पतीपत्नी म्हणून
आज पहिल्यांदा
बऱ्याच दिवसांनी
एकत्र आले...
दोघांच्या चेहऱ्यावर
आनंद होता
लाजत लाजत
त्याला म्हणाली,
"आहो ऐकता का?"
तसा त्याचा चेहरा
एकदम खुश झाला .
तो ऐकण्यास
अधिर झाला
ती लाजत लाजत
त्याला म्हणाली,
"आहो ऐकता का?"
आता म्या ,निवडून आली नव्हं,
तर आता तुम्ही ,
माझ्या पदाचा उपयोग
मला करु द्या,
'क्रांतीज्योतीचा वारसा
मला चालवू द्या,
बाबासाहेबांच्या संविधानाचा
खरा अर्थ,
मला समजून घेऊ द्या'..
माझ्या कर्तव्याशी
मला प्रामाणिक राहू दया,
माझ्या विचारातून
विकास करू दया.
माझे काही
शासकीय धोरण
चुकले तर ,
माझ्या विरूद्ध
जनआंदोलन करुन
मला सांगा,
पण तुम्ही
सभापती किंवा
सदस्य म्हणून
स्वतः मिरवत
बसू नका .
मला पाच वर्ष
काम करु दया .
महिला लोकप्रतिनिधी
म्हणून
मलाच राजकारण करु दया....
.."आहो ऐकता का?"........
